Monday, October 18, 2010

वीर बाजी पासलकर छ्त्रपतींच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती

वीर बाजी पासलकर छ्त्रपतींच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापान केले, जगच्या ईतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्यणासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आंगिकारले.

छ्त्रपति शिवरायांच्या स्वरज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वरज्याचे पहिले सेनापती होते.

ह्या पराक्रमी पुरूषाचा ईतिहास प्रेरणादायी असाच आहे.

वीर बाजी पासलकर

मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र 'यशवंतराव' किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोयातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोयात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.

पुरंदरच्या हल्लात शत्रुला नामोहरम करणारे बाजी पासलकर खळद बेलसर जवळ धारातीर्थी पडले. प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामत झाले. त्यानच्या पराक्राम धर्माच्या स्म्रूतीस आपण सगळे आभिवादन करु.


स्वराज्याची पहिली आहुती । वंदु तव मूर्ती ॥