Friday, July 24, 2015

विश्वभूषण राजे

विश्वभूषण राजे श्री शिव छत्रपती शिवराय...


दरिया हटला मागे
सह्यकडा आसवांनी भिजला
रायगडाच्या कुशीत
माझा राजा निजला
नका देऊ रे भालदारांनो
कुणाच्या भेटीचा निरोप आता
येऊदे माझ्या राजाला
सुखाची झोप आता
जगदीश्वरा तुझ्या पायरीला आता
शिवगंधाचे भाळ टेकणार नाही
नगारखान्या तु पुन्हा
"जगदंब जगदंब" चे बोल ऐकणार नाही
मावळ्यांनो आता सोन्याच्या कड्याला
तुमची चढाओढ लागणार नाही
राजांनी कौतुक करावं म्हणुन
आता कोणी नारळ काढणार नाही
शंभुराजे आता कोण तुम्हाला
"शंभूबाळ" अशी हाक मारणार ???
पोरक्या कवड्याच्या माळे
तुझ्यावर कोणाचा हात फिरणार ???
राजसदर कोमेजलिए राजे
सिंहासनाने मान टाकली आहे
तुमचे पाय शिवायला बघा
नगारखान्याची कमानही झुकली आहे
तानाजी बाजी असतील सेवेला
राजे म्हणुन काळजी वाटत नाही
पण राजे बुरुजावरचा जरीपटका
आता वार्यावर फडफडत नाही
आकाश काळवंडून गेलय
आता तो सुर्यही विझला
रायगडाच्या कुशीत
माझा राजा निजला...

असे घडले महाराज शिवछत्रपती....

असे घडले महाराज शिवछत्रपती............




छत्रपती शिवाजीराजांच्या निर्वाणास आत्ता तीनशे वर्षहून अधिक काळ लोटला ; पण संत ज्ञानेश्वर, एकनाथ , नामदेव , तुकाराम , रामदास याचं जसा विसर मराठी माणसाला अद्याप पडलेला नाही , तीच गोष्ट शिवाजीराजांच्या बाबतीत आहे शिवपुत्र संभाजीचे निमित्त करून अखिल मराठी जनतेला उद्धेशून लिहलेल्या पत्रात , शिवरायाचा आठवावा प्रताप, भूमंडळी" असे रामदास स्वामी आवर्जून का सांगतात ? किवा या अवनितलावर यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत अनेक राजे झाले, त्यात एक जाणता राजा म्हणून त्यांना शिवछत्रपतीची एक आगळी वेगळी उठावदार अशी प्रतिमा का दिसते ? हे समजावे यासाठी केलेले.हे page..""असे घडले महाराज शिवछत्रपती"" ..
... महाराष्ट्र .संस्थापक , "छत्रपती शिवाजी महाराज" यांचा व्यक्तीमहत्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दात इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनावरून उकलून दाखवण्याचा एक प्रयत्न येथे केला आहे ..शिवाजीराजे केवळ लष्करशाह नव्हते , ते "बहुतजनासी आधारू" "श्रीमंत योगी" जाणते राजे" होते हेच मनात बागळून मोठ्या झुंझार पणाने मराठे स्वराज्या साठी लढले....सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेऊन इतीहासाशी इमान राखून पण ललित अगाने ....असे घडले महाराज शिवछत्रपती..याच्या मार्फत शिवशाही लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे.. ....



या जगात सह्याद्री सारखा सखा दुसरा कोणी नाही,सह्याद्री सारखा गुरु दुसरा कोणी नाही ,
पण असा हा भीपरुपी अजिंक्य सह्याद्री ला माझ्या शिवबा ने हर्षभराने सह्याद्रीला मिठी मारली. शिवबाला सह्याद्रीच्या काड्याची कडकडीत भाषा उमगली, त्यांचे मनोगत शिवबाला उमगले ,शिवबाचे हरिद सह्याद्रीला उमगले .....
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि. त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य. तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली. त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो ! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा !सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे... .
दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत...
हे PAGE म्हणजे शिवचरित्र नवे शिवाजीराजांचे व्यक्तीमहत्व ज्या ज्या प्रसंगातून दिसते ते प्रसंग अथवा त्यांची वाणी याचं परिचय सामान्य लोकांना म्हणजेच ज्यांना "अक्षर -ओळख" ज्यांना झाला आहे ......असा पद्धतीने शिवशाहीच गाभा सांगावा असा प्रयत्न येथे केला आहे. ""शिवाजी महाराज"" हे मराठी माणसाचे दैवत आहेत त्यांच्या चरित्र ची रूपरेखा व त्यांचे चरित्र लक्षात यावे म्हणून अगदी मोचक्या शब्दात महाराजांच्या चरित्राचा परिचय येते करून देण्याच मानस आहे... .....मग चला पाहूया ""असे घडले महाराज शिवछत्रपती घडले""........................( ऐतिहासिक पुस्तके )



Wednesday, July 22, 2015

॥जय शिवराय॥

 
मातीसाठी खपतो आम्ही,

कुढत जगणे जमत नाही..


लढत-लढतच मरतो आम्ही,


मेलो तरीही संपत


नाही..

स्वराज्याचे तोरण बांधले,
येऱ्या-गबाळ्याची संगत


नाही..
मुजरा करतो फक्त राजांना,
उगाच कुणापुढेही झुकत नाही..
किती तलवारींचे वार जाहले,
तोडले तरीही तुटत नाही..

 मीच मावळा, मीच मराठा,


कोथळ्याशिवाय परतत नाही..॥


॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा 




 ॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा 




॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥ ॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा