Friday, July 24, 2015

विश्वभूषण राजे

विश्वभूषण राजे श्री शिव छत्रपती शिवराय...


दरिया हटला मागे
सह्यकडा आसवांनी भिजला
रायगडाच्या कुशीत
माझा राजा निजला
नका देऊ रे भालदारांनो
कुणाच्या भेटीचा निरोप आता
येऊदे माझ्या राजाला
सुखाची झोप आता
जगदीश्वरा तुझ्या पायरीला आता
शिवगंधाचे भाळ टेकणार नाही
नगारखान्या तु पुन्हा
"जगदंब जगदंब" चे बोल ऐकणार नाही
मावळ्यांनो आता सोन्याच्या कड्याला
तुमची चढाओढ लागणार नाही
राजांनी कौतुक करावं म्हणुन
आता कोणी नारळ काढणार नाही
शंभुराजे आता कोण तुम्हाला
"शंभूबाळ" अशी हाक मारणार ???
पोरक्या कवड्याच्या माळे
तुझ्यावर कोणाचा हात फिरणार ???
राजसदर कोमेजलिए राजे
सिंहासनाने मान टाकली आहे
तुमचे पाय शिवायला बघा
नगारखान्याची कमानही झुकली आहे
तानाजी बाजी असतील सेवेला
राजे म्हणुन काळजी वाटत नाही
पण राजे बुरुजावरचा जरीपटका
आता वार्यावर फडफडत नाही
आकाश काळवंडून गेलय
आता तो सुर्यही विझला
रायगडाच्या कुशीत
माझा राजा निजला...

No comments:

Post a Comment