Monday, February 20, 2017

स्वतः पासून सुरूवात करा... “यशाचा नवा मंञ - शिवतंत्र"या पुस्तकातील एक लेख”


नसेल कुणाची साथ, मदतीचा हात !
स्वतःपासुनच वेड्या कर तु सुरूवात !
पेटव शिवजोत ती चिरेल काळी रात !
संकटेच करतील तेव्हा संकटावर मात !!

जगाच्या इतिहासात आजपर्यंत जेवढे विजय आणि यश कोणत्याही राजाला मिळाले नाही तेवढे यश शिवाजी राजांना मिळाले.   तुम्ही इतिहास पहा. त्या काळात औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशहा हे पण होते. पण शिवाजींचा जयजयकार का होतो.कारण लक्षात घ्या. बाकीचे राजे स्वतः हातात तलवार घेऊन कधी लढलेच नाहीत. त्यांचे सरदार लढले. पण शिवाजी स्वतः लढले. झुंजले. यामुळे शञुची फौज सरकारी कामगारासारखी काम करायची. लढायच म्हणून लढायची.पण शिवबाचे मुठभर मावळे चिवटपणे लढायचे. कारण पाठीशी त्यांचा राजा होता.

     जावळी जिंकायला, अफजलखान मारायला, आग्रा भेटीला, सुरतेवर, लालमहालात, दक्षिण दिग्विजय येथे स्वतः राजे गेले.
      शिवाजी राजे कोणाची वाट बघत बसले नाहीत. कोणाआड दडले नाहीत . बिनधास्त भिडले, लढले आणि विजयी झाले.
      आपल्याला शिवराय माहिती आहेत पण ज्ञान नाही.
ज्ञान आहे तर जाण नाही.
जाण आहे तर भान नाही.
आणि सगळ आहे पण आपण काही करत नाही.
कारण त्याचे शिवतंत्र आपल्याला कळलेले नाही.
म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यावे.
कुणाची वाट बघाण्यात वेळ घालवुन स्वतःची वाट लाऊन घेऊ नका.
मला घरचे मदत करतील.
बाहेरचे.
मिञ.
शेजारी.
नातेवाईक.
हे मदत करतील.
असा जर विचार करत राहिला तर तुमच काम तर पुर्ण होणार नाही. पण तुमची केस कामातुन जाईल.

अरे ज्यांना स्वतःला काही जमत नाही ते तुला काय मदत करणार.
दुसऱ्याच्या रक्तावर कोणी जास्त दिवस जगत नाही

आणि दुसऱ्याच्या कष्टाने कोणी पिता होत नाही.
ताकद स्वतःत असावी लागते.

कोणी तरी म्हणाले की दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. पण मी म्हणतो फक्त कार्यभागच नाही तर

कार्य पण बुडाले
भाग पण बुडाला
आणि हा महाभाग प्राणी पण बुडाला.

कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका. ती पुर्ण होत नाहीच. पण अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते.
वाटेत येणाऱ्या काट्यांना दुर करण्यात वेळ घालवु नका. पायात लोखंडी चप्पल घाला.
जे स्वतः पुढे होतात तेपुढेच जातात.

जे मागे राहतात ते मागेच राहतात

त्या मुळे शिवजयंतीला शपथ घेऊया आणि स्वतःपासूनच सुरूवात करूया

No comments:

Post a Comment